ड्रग्स प्रकरण : आर्यनशी व्हॉट्सअॅपवर चॅट करणारी अभिनेत्री कोण?

NCBकडून काही पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ड्रग्स प्रकरण : आर्यनशी व्हॉट्सअॅपवर चॅट करणारी अभिनेत्री कोण?
SHARES

मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयानं आर्यन खानसह (Aryan Khan) अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. जामीनासाठी चाललेल्या सुनावणीत NCBकडून काही पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत. अशी माहिती एएनआय या वृत्त संस्थेनं दिली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, NCBच्या हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. सुनावणीदरम्यान एनसीबीनं ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले.

असंही म्हटलं जात आहे की, ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीनं तिला सोडून दिलं होतं. येत्या काळात या अभिनेत्रीची एनसीबी टीमकडून चौकशी केली जाऊ शकते. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

याशिवाय, जामिनावरील सुनावणीपूर्वी काही ड्रग पॅडलरसोबतचे आर्यनचे चॅटदेखील न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

३ ऑक्टोबरला अटक करण्यात आलेला आर्यन ८ ऑक्टोबरपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला तुरुंगात कैदी क्रमांक ९५६ चा बॅच मिळाला आहे. आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही २१ ऑक्टोबरला संपत आहे.

दरम्यान, आर्यनचे वकील अमित देसाई यांनी आर्यनच्या कबुलीजबाबाचे सक्तीचा जबाब म्हणून वर्णन केलं आहे. देसाई म्हणाले की, एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यननं कबूल केलं की, तो अरबाजसोबत चरस घेणार होता. परंतु अशा गोष्टी कशा स्वीकार करायला लावल्या जातात, हे देखील न्यायालयाला माहित आहे.

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना अटक करण्यात आले होते. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता. 

अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्यांना सुरुवातीला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यानंतर ४ ऑक्टोबरला ३ दिवस एनसीबी कोठडी आणि ७ ऑक्टोबरला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली होती.  


हेही वाचा

शाहरुखला पुन्हा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

नजर ठेवत असल्याच्या वानखेडेंच्या आरोपावर गृहमंत्री म्हणाले...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा