नजर ठेवत असल्याच्या वानखेडेंच्या आरोपावर गृहमंत्री म्हणाले...

समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणं आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे.

नजर ठेवत असल्याच्या वानखेडेंच्या आरोपावर गृहमंत्री म्हणाले...
SHARES

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणं आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीकडे तक्रारही केली आहे. आता या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

समीर वानखेडे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की, मुंबई पोलिसांचे अधिकारी त्यांच्यावर पाळत ठेवतात. अशा कोणत्याही सूचना कुणालाच देण्यता आलेल्या नाहीत.”

तसंच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला जास्त काही माहिती नसल्याचंही पाटील म्हणाले आहेत. याविषयाची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेल असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणे आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. याविषयी त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीकडे तक्रारही केली आहे. मात्र, याला वानखेडे यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. वानखेडे यांनी पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही सादर केले आहे.

मुंबई एनसीबी टीमच्या इतर अधिकाऱ्यांनाही 'ट्रॅक' केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलिसांचं एक पथक स्मशानभूमीत गेले आहे आणि तेथून एक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतला आहे.

वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून ते जवळजवळ दररोज स्मशानभूमीला भेट देतात. यानंतर त्यांना पाठलाग केला जात असल्याचा संशय आला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीची ड्रग चॅट समोर आल्यानंतर हे प्रकरण एनसीबीकडे गेले होते. या प्रकरणानंतर वानखेडे प्रकाशझोतात आले. त्यांनी आतापर्यंत अभिनेत्री दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्ती, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, भारती सिंह आणि अभिनेता अर्जुन रामपाल यासारख्या हायप्रोफाईल सेलिब्रिटींची चौकशी केली आहे.हेही वाचा

'त्या' प्रकरणी समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा