आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

जाणून घ्या आजच्या सुनावणीत काय झालं ते...

आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी
SHARES

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत एनसीबी कोठडीतच असणार आहे. कारण आता आर्यनच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी करण्यात येणार आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आली होती.

या प्रकरणी किमान २ ते ३ दिवसांचा वेळ देण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली आहे. अशातच आर्यन खानच्या जामीनावर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश एनसीबीला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आता थेट बुधवारी सुनावणी घेतली जाणार आहे.

क्रूज ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सह ३ लोकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. परंतु, एनसीबीनं याचिकेवर उत्तर देण्यासाठी मागितलेल्या वेळामुळे आजची सुनावणी टळली आहे. आता थेट बुधवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, शनिवारी मुंबई लोअर कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. लोअर कोर्टाचं म्हणणं होतं की, एनडीपीएसच्या ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे, त्या कलामांतर्गत जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा त्यांना अधिकार नाही.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींना एक लग्जरी क्रूझवरील पार्टीमध्ये ड्रग रेड दरम्यान, ताब्यात घेतलं होतं. एनसीबीनं दावा केला होता की, या कारवाई दरम्यान, क्रूझवरुन अनेक वेगवेगळ्या ड्रग्स जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.हेही वाचा

आलीशान बंगलोत राहणारा आर्यन खान खातोय तुरुंगाची हवा

आर्यन खान प्रकरणातील साक्षिदारावरच फसवणुकिचे गुन्हे दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा