आर्यन खान प्रकरणातील साक्षिदारावरच फसवणुकिचे गुन्हे दाखल

आर्यन खानसोबत सेल्फी काढणाऱ्या आणि NCBचा साक्षिदार असलेल्या किरण गोसावीवर २००७, २०१५ आणि २०१८ या वर्षात फसवणुकिचे गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तर तो फरार असल्याचंही वृत्त आहे.

आर्यन खान प्रकरणातील साक्षिदारावरच फसवणुकिचे गुन्हे दाखल
SHARES

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (shah rukh Khan) मुलगा आर्यन खानसोबत (Aryan khan) एक व्यक्ती सेल्फि घेणारा फोटो प्रचंड व्हायरल झाला. फोटोत आर्यन खानसोबत असलेला व्यक्तीचं नाव किरण गोसावी आबहे. हा व्यक्ती NCB अधिकारी नसून एका राजकीय पक्षातीलच आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता.

या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, त्या गोसावीवर २००७पासून गुन्हे दाखल आहेत अशी बातमी इंडिया टुडेनं आपल्या वृत्तात दिली आहे.

यामध्ये लोकांची फसवणूक करुन लाखो रुपये घेणे, धमकी देण्यासारखे गुन्हे आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे.

पुण्यात फरार घोषित

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आरोपी किरण प्रकाश गोसावीवर २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची ३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी २९ मे २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. परंतु, तो सापडला नसल्यामुळे फरार घोषित करण्यात आलं होतं.

ठाण्यात फसवणुकिचा गुन्हा

तर नवाब मलिक यांच्या आरोपानुसार ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गोसामी विरोधात गुन्हा दाखल आहे. हा देखील फसवणुकीचा गुन्हा आहे. २०१५ साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. एका व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखवून हजारो रुपये या किरण गोसावीनं उकळले होते. सध्या ही केस कोर्टात प्रलंबित आहे.

आता त्याचा फोटो व्हायरल झाल्यानं तो गोत्यात येऊ शकतो. कारण पुणे पोलिस यांनी त्याला फरार घोषित केले होते. आता व्हायरल झालेल्या फोटोमुळे तो प्रकाशजोतात आला आहे. त्यामुळे फसवणुकिच्या केसमध्ये त्याला पुणे पोलिस अटक करू शकतात.

अंधेरीतही गुन्हा दाखल

तर आणखी एका वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये ३ जानेवारी २००७ ला व्यंकटेशम शिवा वायरवेल नावाच्या तक्रारदारनं किरण गोसावी विरुद्ध तक्रार दिली.

व्यंकटेशमनं आरोप केला होता की, किरण गोसावीनं त्याच्या क्रेडिट कार्डची डिलिव्हरी न देता त्यांच्या क्रेडिट कार्डनं १७ हजार ५०० रुपयांची शॉपिंग केली. या प्रकरणात मे २००७ मध्येच त्याला पोलिसांनी अटक केली होती. पण याप्रकरणात गोसावीला निर्दोष मुक्त करण्सात आलं.

आता साक्षिदारावरच अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे कोर्टात साक्षिदाराच्या साक्षीवर नक्कीच बचाव पक्षाचे वकिल प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात.   



हेही वाचा

शाहरुखचा मुलगा आर्यन खानला न्यायालयीन कोठडी

आर्यन खानच्या जामिनाचा मार्ग मोकळा? वाचा काय झालं कोर्टात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा