आर्यन खानच्या जामिनाचा मार्ग मोकळा? वाचा काय झालं कोर्टात

आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

आर्यन खानच्या जामिनाचा मार्ग मोकळा? वाचा काय झालं कोर्टात
SHARES

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार, अशी माहिती बचाव पक्षाचे वकिल मानशिंदे यांनी दिली. याशिवाय आरोपींना एक दिवस NCB च्या कोठडीतच ठेवण्याची मागणी बचाव पक्षांच्या वकिलांनी केली होती. याला किल्ला कोर्टानं परवानगी दिली आहे.

आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या आठही जणांच्या जामीन अर्जावर उद्या सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानची गुरुवारची रात्रही एनसीबी कारागृहातच जाणार आहे.

आर्यन खानच्या जामिनावर NCB ला उद्या सकाळी उत्तर देण्यात कोर्टानं सांगितलं आहे. त्याशिवाय हे उत्तर लिखित स्वरुपात द्यावं लागेल. आम्ही या जामिनाला विरोध करणार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.

दरम्यान, हे ड्रग्ज प्रकरण दिल्ली-मुंबईपुरती मर्यादीत नाही, तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. क्रूझवर पार्टीसाठी जे ड्रग्ज आणण्यात आलं होतं, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला होता, असा दावा NCBनं केला आहे.

यासोबतच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलंय. या तस्कराच्या चौकशीनंतर ड्रग्जसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याची माहिती मिळाली आहे.

आता या प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली आहे. कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, या पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पाच पेक्षा जास्त लोक याठिकाणी जमलेच कसे, याचा तपासही आता मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही याप्रकरणात कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या मुंबई पोलिसांनी विविध यंत्रणांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.



हेही वाचा

शाहरुखचा मुलगा आर्यन खानला न्यायालयीन कोठडी

मुंबई पोलिसही करणार क्रूझ पार्टी प्रकरणाचा तपास

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा