शाहरुखचा मुलगा आर्यन खानला न्यायालयीन कोठडी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्य खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शाहरुखचा मुलगा आर्यन खानला न्यायालयीन कोठडी
SHARES

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्य खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आर्यन खान २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असेल.

आर्यन खान सोबतच अरबाज मर्चंड आणि इतर ६ जणांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ जणांवर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकानं (एनसीबी) कारवाई केली. याप्रकरणी आर्यन खानसह अन्य ३ आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी म्हणजे आज त्याला न्यायालयात हजर केलं होतं.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकानं प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी आर्यनसह ८ जणांना रविवारी अटक केली. त्यानंतर आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती.

याप्रकरणी आर्यनसह इतर आरोपींना सोमवारी मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यामुळं आर्यनला जेल होणार की बेल मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर याबाबत न्यायालयानं निर्णय दिला आहे. त्यानुसार, अखेर आर्यन खानसह अन्य ३ आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती.

आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. 

तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह आणि धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचं समोर आल्यानं, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी. अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती.

४ ऑक्टोबर रोजी एनसीबीनं न्यायालयाला सांगितलं होतं की,आर्यन कोडवर्डमध्ये चॅट करत असे आणि हे डीकोड करण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक आहे. त्याच्या अनेक चॅटमधून त्याचे डीलर्सशी संबंध असल्याचे उघड होते.

तसंच आंतरराष्ट्रीय व्यवहार झाल्याचे देखील स्पष्ट होत आहे. आरोपींनी ड्रग्स पॅडलरशी व्यवहार करण्यासाठी कोडवर्डचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत आरोपींना रिमांडमध्ये समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे.



हेही वाचा

मुंबई पोलिसही करणार क्रूझ पार्टी प्रकरणाचा तपास

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 'डोंगरी'तून १५ कोटींचे ५ किलो हिरोईन जप्त

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा