आलीशान बंगलोत राहणारा आर्यन खान खातोय तुरुंगाची हवा

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या सर्वात मोठ्या तुरुंगात म्हणजेच आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं.

आलीशान बंगलोत राहणारा आर्यन खान खातोय तुरुंगाची हवा
SHARES

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या सर्वात मोठ्या तुरुंगात म्हणजेच आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. पण न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्थर रोड जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंड यांना आर्थड रोड जेलमध्ये ठवण्यात आलं आहे. तर मुनमुन ढमेजाला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर बचाव पक्षाचे वकिल सत्र न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. पण तोपर्यंत आर्यनला आर्थड रोडमध्येच जावं लागेल.   

२ ऑक्टोबरला संध्याकाळी क्रूझमधून ताब्यात घेतलेल्या आर्यनला रविवारी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ताब्यात होता. या दरम्यान त्याला ३ वेळा न्यायालयात हजर राहावे लागले. नियमानुसार, त्याला दररोज मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेलं जात होतं.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता आर्यन खान २१ ऑक्टोबरपर्यंत आर्थड रोड तुरुंगात असेल.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत आरोपींना एक दिवस NCB च्या कोठडीतच ठेवण्याची मागणी बचाव पक्षांच्या वकिलांनी केली होती. याला किल्ला कोर्टानं परवानगी दिली होती.

गुरुवारी आर्यनला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या आठही जणांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामुळे आर्यन खान गुरुवारी रात्री एनसीबी कारागृहातच होता. पण आता जामीन अर्ज फेटाळल्यानं त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

आर्यन खान सोबतच अरबाज मर्चंड आणि इतर ६ जणांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्यांची जामिन याचिका फेटाळण्यात आल्यानं त्यांना न्यायालयीन कोठडीत जावं लागलं.



हेही वाचा

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

क्रूझ ड्रग्ज पार्टीत होता भाजप नेत्याचा मेहुणा; नवाब मलिकांची माहिती, उद्या करणार नाव घोषित

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा