आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला
SHARES

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे. 

दरम्यान गुरुवारी झालेल्या सुनावणीत आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता आर्यन खान २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असेल.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत आरोपींना एक दिवस NCB च्या कोठडीतच ठेवण्याची मागणी बचाव पक्षांच्या वकिलांनी केली होती. याला किल्ला कोर्टानं परवानगी दिली होती.

गुरुवारी आर्यनला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या आठही जणांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी  झाली. त्यामुळे आर्यन खान गुरुवारी रात्री एनसीबी कारागृहातच होता. 

आर्यन खान सोबतच अरबाज मर्चंड आणि इतर ६ जणांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्यांची जामिन याचिका फेटाळण्यात आल्यानं त्यांना न्यायालयीन कोठडीत जावं लागेल. 

सध्या आर्यन खानची आर्थड रोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यासोबत अरबाज मर्चंट, मुनमुन ढमेजा यांना देखील आर्थड रोड कारागृहातच नेण्यात आलं आहे.   

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ जणांवर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकानं (एनसीबी) कारवाई केली. याप्रकरणी आर्यन खानसह अन्य ३ आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी म्हणजे त्याला न्यायालयात हजर केलं होतं.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकानं प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी आर्यनसह ८ जणांना रविवारी अटक केली. त्यानंतर आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती.

आर्यन खानसोबत (Aryan khan) एक व्यक्ती सेल्फि घेणारा फोटो प्रचंड व्हायरल झाला. फोटोत आर्यन खानसोबत असलेला व्यक्तीचं नाव किरण गोसावी आबहे. हा व्यक्ती NCB अधिकारी नसून एका राजकीय पक्षातीलच आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता.

या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, त्या गोसावीवर २००७पासून गुन्हे दाखल आहेत अशी बातमी इंडिया टुडेनं आपल्या वृत्तात दिली आहे.


हेही वाचा

आर्यन खान प्रकरणातील साक्षिदारावरच फसवणुकिचे गुन्हे दाखल

आर्यन खानच्या जामिनाचा मार्ग मोकळा? वाचा काय झालं कोर्टात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा