शाहरुखला पुन्हा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.

शाहरुखला पुन्हा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला
SHARES

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे.

आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांसाठी वाढला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Goa Cruise Drugs Party) आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.

मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयानं आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.

आर्यनच्या जामिनाला विरोध करताना अनिल सिंग म्हणाले होते की, रेकॉर्ड आणि पुरावे दर्शवतात की आर्यन गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेतोय. सरकारी वकिलांनी सांगितले की, आर्यन खूप प्रभावशाली व्यक्ती आहे आणि जर जामिनावर सुटला तर पुराव्यांशी छेडछाड करु शकतो किंवा कायद्यापासून पळवाट काढू शकतो.

बचाव पक्ष म्हणाले की, आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नाहीत. तसंच NCB ला कोणतीही रोख रक्कम मिळाली नाही. ज्या व्यक्तीनं आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित केलं त्याला अटक झाली नाही. आर्यनचा मुनमुन धामेचाशी कोणताही संबंध नाही.

मुंबईतील स्पेशल NDPS कोर्टाच्या वीवी पाटील खंडपीठानं १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या दीर्घ युक्तिवादानंतर जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. अखेर यावर आज निर्णय दिला असून आर्यनला दिलासा देण्यात आला नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, NCBच्या हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले.

असंही म्हटलं जात आहे की, ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीनं तिला सोडून दिलं होतं. येत्या काळात या अभिनेत्रीची एनसीबी टीमकडून चौकशी केली जाऊ शकते. 

याशिवाय, जामिनावरील सुनावणीपूर्वी काही ड्रग पॅडलरसोबतचे आर्यनचे चॅटदेखील न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.हेही वाचा

एनसीबी विरोधात शिवसेना नेते सर्वोच्च न्यायालयात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा