एनसीबी विरोधात शिवसेना नेते सर्वोच्च न्यायालयात

याचिकेतून आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा हवाला देण्यात आला आहे.

एनसीबी विरोधात शिवसेना नेते सर्वोच्च न्यायालयात
SHARES

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात आता शिवसेनेच्या एका नेत्यानं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. 

शिवसेनेचे नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी आर्यन खानच्या समर्थनार्थ ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा हवाला देण्यात आला आहे. 

याप्रकरणी स्यू मोटो दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना लक्ष करून कारवाई करण्यात आल्याचंही म्हटलं आहे.

या प्रकरणी सरन्यायाधीशांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या प्रकरणात एनसीबीच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

किशोर तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर संजय राऊत यांनी सीएनएन न्यूज 18 ला प्रतिक्रिया देताना म्हटलं, या याचिकेचा शिवसेनेशी संबंध नाही. एक पक्ष म्हणून आम्ही किशोर तिवारी यांच्या भूमिकेशी संबंधित नाही आणि ती याचिका शिवसेना पक्षाची नाहीये.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज घेणे-विक्रीशी संबंधित एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आर्यन खान याच्याकडून ६ mg अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा दावा एनसीबीनं केला. आर्यन खानला अटक करण्यात आल्यावर त्याचा फोन एनसीबीने जप्त केला आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर १४ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. त्याचा जेलमधील मुक्काम वाढला. NCB चे वकिल अनिल सिंह यांनी सांगितलं की, आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये.

आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. २० ऑक्टोबर रोजी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावणी होईल.हेही वाचा

किरण गोसावीविरोधात लूकआऊट नोटीस जारी

नजर ठेवत असल्याच्या वानखेडेंच्या आरोपावर गृहमंत्री म्हणाले...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा