आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

आता यामुळे त्याच्या तुरुंगाच्या मुक्कामात पुन्हा वाढ झाली आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
SHARES

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्याच्या सुनावणीवर पुढच्या आठवड्यात म्हणजेच मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढचे ६ दिवस त्याचा मुक्काम तुरुंगातच असेल.

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात गेला होता. आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी पुढे ठकलण्यात आली आहे.

दरम्यान, सुनावणीआधी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं. शाहरुख एकटा आतमध्ये गेला होता. गौरी खान त्याचासोबत नव्हती.

२ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला होता.

बुधवारी न्यायालयानं जामीन नाकारताना आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा