NCB ची धडक कारवाई, ड्रग्ज तस्करीतला मोठा मासा गळाला

अखलाक अहमद अब्दुल अन्सारी असे या तस्कराचे नाव असून त्याच्याजवळून पोलिसांनी ३० लाखांचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे.

NCB ची धडक कारवाई, ड्रग्ज तस्करीतला मोठा मासा गळाला
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर ड्रग्ज तस्करांच्या मुस्क्या आवळण्यास NCB ने सुरूवात केली आहे. याच प्रकरणात एका मोठ्या तस्कराला पकडण्यात NCB ला यश आले आहे. अखलाक अहमद अब्दुल अन्सारी असे या तस्कराचे नाव असून त्याच्याजवळून पोलिसांनी ३० लाखांचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे.

हेही वाचाः-'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान

मुंबईत Narcotics Control Bureau म्हणजेच NCBने मोठं ड्रग्ज रॅकेट ( Drug racket in Mumbai) उद्ध्वस्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत NCBची धडक कारवाई सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू नंतर ड्रग्जचं प्रकरण बाहेर आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर NCBने अंमली पदार्थांचा ड्रग्ज तस्करीत एकेकाळी डी कंपनीचा बोलबाला असताना. यात आता नायझेरियन तस्करांनी उडी घेतल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात तस्करांची साखळी तयार झाली. त्यामुळे नशेच्या आहारी गेलेल्यांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळू लागले. मुंबईत डोंगरी परिसर तस्करांचा मोठा अड्डा बनला होता. दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपासही आता डोंगरीपर्यंत पोहचला. NCBने मुंबईतल्या डोंगरी भागात ही कारवाई केली असून अखलाक अहमद अब्दुल अन्सारी या तस्कराला अटक केली आहे. या तस्कराकडे MD ड्रग्ज सापडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ३० लाख एवढी आहे. अन्सारी विरुद्ध या आधीही गुन्हे नोंदवलेल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचाः-अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण?

NCBने मंगळवारी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला होता. कतारहून एका जहाजामध्ये हा माल येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. अन्सारीच्या अटकेनंतर महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. अन्सारी हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतला एक मोहोरा असून त्याच्या मागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित विषय