नशेसाठी वापर होणाऱ्या एलएसडी पेपर या ड्रग्जचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. केंद्रीय अंमली पदार्थ विभागाने नुकतीच मोठ्या LSD ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोघांना अटक केली आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी या तिघांजवळून ३३६ LSD पेपर, ६ ग्रॅम कोकेन, ४३० गांजा, जप्त केला आहे.
चरस, गांजा, एमडी पावडरच्या तस्करीसह एलएसडी पेपरची तस्करी वाढू लागली आहे. एखाद्याजवळ हा पेपर असला तरी हे ड्रग्ज आहे, याबाबत कोणाला काहीच संशय येत नाही. त्यामुळे जवळ बगळण्यास अत्यंत सोयीस्कर असलेल्या एलएसडी पेपरच्या तस्करीकडे तस्कर वळू लागले आहेत. विशेषकरून तरुणवर्ग यामध्ये अधिक अडकू लागल्याचे दिसत आहे. या पेपरच्या सेवनानंतर व्यक्ती १२ ते १५ तास नशेमध्ये राहतो. त्यामुळे नशेबाजही एलएसडीची नशा करत असल्याचे सांगितले जात आहे. पेपरचा छोटाशा तुकड्याची बाजारात पाच हजार रुपये किंमत आहे. पबमध्येही हा पेपर विक्री केला जात असून गोव्यात एलएसडीचा नशेसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. NCB ने या कारवाई दरम्यान अरबाज शेख, विनीत चंद्राण, तर नेरूळहून सुरज सिंग या तरुणाला अटक केली आहे.