सुशांत आत्महत्या प्रकरण : NCB चे मुंबईत ५ ठिकाणी छापे

हा अभिनेता ताब्यात आला तर आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरण : NCB चे मुंबईत ५ ठिकाणी छापे
SHARES

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाल्यानंतर एनसीबीने ड्रग्ज माफियांभोवती फास आवळण्यास सुरूवात केली. याच कारवाईचा एक भाग म्हणून एनसीबीने बुधवारी मुंबईत ५ ठिकाणी छापे टाकले आहेत. चौकशीत बॉलिवूडचा अभिनेता NCBच्या रडावर आला असून तो गेल्या काही दिवसांपासून सापडत नसल्याची माहिती NCBच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः-कंगनाची सोमवारी होणार चौकशी,  मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली नोटीस

काही दिवसांपूर्वी NCBने Agisialos Demetriades या आफ्रिकन महिलेला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. ही महिला बाॅलीवूडमधील एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. चौकशीत या अभिनेत्याचं नाव समोर आलं होतं. हा अभिनेता ड्रग्जसाठी या आरोपीच्या संपर्कात होता अशी माहिती NCBला मिळाली होती. त्यानंतर तपासाची चक्रे त्या दिशेने वळली होती. नव्या माहितीच्या आधारे एनसीबीने ५ ठिकाणी छापे घालून शोधकार्य केलं. त्या अभिनेत्याच्या घरीही अधिकाऱ्यांनी चौकशी केली मात्र तो घरीच नसल्याचं त्यांना आढळून आलं आहे. या आधी या अभिनेत्या समन्स बजावण्यात आला होता. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अभिनेता ताब्यात आला तर आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचाः- खूशखबर! अखेर महिलांना मिळाली लोकल प्रवासाची परवानगी

सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यालाही या प्रकरणात अकट करण्यात आली होती. रिया सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आली आहे. ड्रग्ज तस्कर यांना ड्रग्जचा पुरवढा करत असत आणि त्यांच्याकडून मग विविध ठिकाणी त्याचा पुरवढा केला जात असे असा आरोप आहे.या प्रकरणात अनेक मोठ्या कलाकारांची नावंही समोर आली होती. त्यानंतर त्यांची चौकशीही झाली आहे. या प्रकरणात काही चॅटही समोर आले होते. त्या माहितीच्या आधारे NCBने चौकशी केली होती. बॉलिवूड आणि ड्रग्ज याचं कनेक्शन हे फार जुनं असून अशा काही घटना घडल्या की त्याच वेळी त्याची चर्चा होते. मात्र नंतर काहीच होत नाही असं मत व्यक्त केलं जातं. या प्रकरणी मोठं आंतरराष्ट्रीय रॅकट असून ते उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही असं मत अनेक कलाकारांनी व्यक्त केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा