शौचालयात आढळले अर्भक

 Ghatkopar
शौचालयात आढळले अर्भक

घाटकोपर - सार्वजनिक शौचालयामध्ये 2 महिन्याचं अर्भक आढळल्याची घटना बुधवारी सकाळी घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी येथे घडली आहे. एका महिलेला शौचालयात हे अर्भक दिसले. तिने तत्काळ याची माहिती पंतनगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे अर्भक ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. तर, पोलीस त्या मातेचा शोध घेत आहेत. गेल्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा असंच एक अर्भक आढळलं होतं.

Loading Comments