हेरगिरीप्रकरणः पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्यास अटक

नौदलात हेरगिरी करणाऱ्या 11 अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला भारताच्याा नौदलातील गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप केेेेला आहे.

हेरगिरीप्रकरणः  पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्यास अटक
SHARES
 एनआयए (राष्ट्रीय तपास पथक)ने काही दिवसींपूर्वी नौदलात हेरगिरी करणाऱ्यांचा पर्दाफाश केला होता. या पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्यास 'एनआयए'ने मुंबईतून अटक केली आहे. अब्दुल रेहमान अब्दुल जब्बार शेख(53) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांना त्याच्या घराची झडती घेेेेेतली असता. त्याच्याघरीत हेरगिरीसाठी लागणारे अद्ययावत उपकरणे व कागदपत्रे जप्त मिळून आली आहेत. त्यात नौदलात हेरगिरी करणाऱ्या 11 अधिकाऱ्यांनी  पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला भारताच्याा नौदलातील गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप केेेेला आहे. तपासात शेखची पत्नी साहिस्ता कैसर हिने देखील गुप्तहेरांपर्यंत पैसे पुरवल्याचेे स्पष्ठ झालेे आहे. 

मुंबईतील नौदल पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या डॉकयार्डमध्ये हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा नौदल गुप्तहेर खात्याने डिसेंबर 2019 मध्ये पर्दाफाश केला होता. यातील दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना मुंबईच्या नौदल डाँकयार्ड येथून अटक केली होती. तपासात  सात नाविक हे पाकिस्तानी हेर असल्याचे समोर आले. त्यातील दोन हेर हे  मुंबईतील नौदल गोदीत व कारवार येथील 'आयएनएस कदंबा' या नाविक तळावर कार्यरत असल्याने निदर्शनास आल्यानंतर  दोघांना अटक करण्यात आली होती.

जम्मू-कश्मीर केंद्र शासित प्रदेश जाहिर केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. युद्धजन्य परिस्थिती पाहता सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमिवर नौदलातील गुप्तहेर पथकाला  नौदलात पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नौदलाने विशाखापट्टणम तळावर शोध घेतला असता. बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन नाविक नौदलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली. हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाकिस्तानातील त्यांच्या हॅण्डलरला माहिती देत होते. अटक करण्यात आलेले हे सर्व सात नाविक 22 ते 24 वर्षाचे असून  अलिकडेच ते नौदलात भरती झाले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे नौदलात दाखल झाले आहेत. या कारवाईत आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो हवालामार्फत या सात जणांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. नौदलाने रात्री ही मोहीम राबवली. त्यानंतर ही विशेष मोहीम राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली. नौदलाने या कारवाईला 'ऑपरेशन डॉलफिन नोज' असे नाव दिले होते.

 तपासात पुढे या पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्या मोहम्मद हारून हाजी अब्दुल रेहमान लकडावाला या मुंबईतील रहिवाश्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो या कटात सामील असल्याचे निष्पन्न झाले होते. शेखच्या अटकेमुळे याप्रकरणी अटक आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या अधिका-यांनी त्याला गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सामील करून घेतले होते. भारतीय नौदलाच्या बोटी, पाणबुड्यांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येत होता. त्यावेळी समाज माध्यमांच्या मदतीने 11 नौदल अधिकारी व कर्मचारी या व्यक्तींच्या संपर्कात आले. पैशांच्या बदल्यात त्यांच्याकडून माहिती घेतली जायची. भारतातील हस्तकाच्या मदतीने या नौदल अधिकारी व कर्मचा-यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते. संबंधित विषय