आझाद मैदान पोलीस ठाण्यातून नायजेरियन आरोपी फरार

 Pali Hill
आझाद मैदान पोलीस ठाण्यातून नायजेरियन आरोपी फरार

मुंबई - नायजेरियन आरोपी आझाद मैदान पोलीस ठाण्यातून पळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या आरोपीचं नाव जॉन केनेड्य ओकोरो असून आरोपी नाशिक तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याच्या शिक्षेचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत होता. आरोपीच्या चौकशीसाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नाशिकमधून मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जानेवारीला त्याची सुटका करून पुन्हा नायजेरियाला पाठवण्यात येणार होतं. मात्र सुटकेच्या आधीच आरोपी जॉनने पलायन केलं. याप्रकरणी सध्या आझाद मैदान पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Loading Comments