पोलीस ठाण्यातून पळालेल्या नायजेरियन आरोपीला अटक

 Pali Hill
पोलीस ठाण्यातून पळालेल्या नायजेरियन आरोपीला अटक
पोलीस ठाण्यातून पळालेल्या नायजेरियन आरोपीला अटक
See all

मुंबई - आझाद मैदान पोलीस ठाण्यातून पलायन झालेल्या नायजेरियन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जाॅन कॅनेडी चुकुवू इनेका उकोरो (35) असे या नायजेरियन आरोपीचे नाव आहे. तो 2 जानेवारीला आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला होता. मात्र अखेर आरोपी बोरिवली हायवे येथून बंगळूरूला जाणाऱ्या गाडीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, तात्काळ पोलिसांना कळवून त्याला अटक केली. त्याच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो नाशिक तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याच्या शिक्षेचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत होता. आरोपीच्या चौकशीसाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नाशिकमधून मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जानेवारीला त्याची सुटका करून पुन्हा नायजेरियाला पाठवण्यात येणार होतं. मात्र सुटकेच्या आधीच आरोपी जॉनने पलायन केलं.

Loading Comments