Nirav Modi’s assets worth Rs 329 cr seized by ED नीरव मोदीची 'इतकी' कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

नीरवला मोदी फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या नव्या कायद्यानुसार सर्व मालमत्ता जप्त करण्यास परवानगी देण्यात आलेली होती

Nirav Modi’s assets worth Rs 329 cr seized by ED नीरव मोदीची 'इतकी' कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
SHARES

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार आरोपी नीरव मोदीला ईडीने आज आणखी एक धक्का दिला आहे. नीरव मोदीची ३३० कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणात नीरवने बँकेला १४ हजार कोटी रुपयांना फसवले आहे. नीरवला मोदी फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या नव्या  कायद्यानुसार सर्व मालमत्ता जप्त करण्यास परवानगी देण्यात आलेली होती.

हेही वाचाः- Devendra fadnavis: मुंबईत ८०६ रुग्ण आढळल्यावर थोडं बरं वाटलं, पण खरं कारण वेगळंच- फडणवीस

अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात नीरव मोदीच्या संपत्तीबाबत काही दिवसांपूर्वी  माहिती जाहिर केली होती.  त्यात नीरव मोदी याची मुंबई, दिल्ली, जयपूर, अलिबाग, सूरत येथे मालमत्ता आहे. या १४०० कोटींच्या संपत्तीवर आता भारत सरकारचा अधिकार असणार असल्याचे जाहिर केले होते. या शहरांमध्ये नीरव मोदीची अलिशान घरं, फ्लॅट्स, कोट्यवधी रुपयांची अपार्टमेंट्स, कोट्यवधी रुपयांची आलिशान कार्यालये आणि बरेच भूखंड आहेत. नीरव मोदीचे मुंबईतील वरळी येथील समुद्र महल नावाच्या इमारतीत सहा अपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक अपार्टमेंटची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. भारतातून फरार होण्यापूर्वी नीरव मोदी कुटुंबियांसह या अपार्टमेंटमध्ये राहत होता. नीरव मोदी याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही आहे, ही सर्व संपत्ती जप्त केली जाणार होती. त्यानुसार ईडीने या सर्व मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत वरळीतील चार आलीशान फ्लॅट, अलीबाग येथील जमीन व समुद्र किनारी असलेल्या फार्महाऊस, जैसलमेर येथील पवनचक्की,लंडन येथील फ्लॅट, युएईकतील फ्लॅट, शेअर्स व बँकेतील ठेवींचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा:-वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी

या सर्व मालमत्तेची किंमत ३२९ कोटी ९९ लाख रुपये आहे. याआधीही ईडीने नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली होती.  मार्च २०२० मध्ये झालेल्या त्याच्या मालमत्तेच्या लिलावातून ५१ कोटी रुपये मिळाले होते. ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. नीरव मोदीच्या लिलाव केलेल्या संपत्तीमध्ये रॉल्स रॉयल्स कार, एमएफ हुसेन आणि अमृता शेरगिल यांची पेंटिंग्स आणि डिझाइनर हँडबॅग्जचा समावेश होता. यापूर्वी, सैफरनआर्टने मार्च २०१९ मध्ये नीरव मोदीच्या मालकीच्या काही कलाकृतींचाही लिलाव करण्यात आला होता, त्यातून ५५ कोटी रुपये मिळाले होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँक ची १४ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी हा देशातून फरार असून त्यांच्या प्रत्यर्पणाबाबत ब्रीटनमधील न्यायालयात सप्टेंबर महिन्यात सुनावणी होणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा