एका दिवसात कोरोना बाधित पोलिसांची संख्या दुप्पट


एका दिवसात कोरोना बाधित पोलिसांची संख्या दुप्पट
SHARES
देशात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढत असताना, याच कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी 24 तास झटणाऱ्या पोलिसांना माञ या संसर्गाने विळखा घालण्यास सुरूवात केली आहे. काल पर्यंत पोलिस दलात 7 जणांना कोरोना झाला होता. माञ अवघ्या 24 तासाच हा आकडा 15 वर पोहचल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरात 23 पोलिसांना(सात अधिकारी व 16 कर्मचारी) कोरानाची लागण झाली आहे. त्यातील 65 टक्के पोलिस एकट्या मुंबईतील आहे.



कोरोनाच्या नवनवीन रुग्ण समोर येत असतानाच, बुधवारी जुहू पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाला कोरोनाची लागण झाली. तो वांद्रे येथील वसाहतीत वास्तव्याला आहे. ती इमारत सील करण्यात आली आहे.  याशिवाय रफी किडावाई मार्ग वसाहतीतील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची लागण झालीकोरोनाची लागण झालेला पोलीस अधिकारी ज्या वसाहतीत राहत होता, ती वसाहत सील करण्यात आली आहे. संबंधीत अधिकारी विशेष शाखा 1 येथे कर्तव्यावर आहेत. ते त्यांच्या इतर दोन पोलीस अधिकारी सहका-यासह आरएके मार्ग पोलीस वसाहतीत राहत आहेत. याशिवय दोन दिवसापूर्वी एक कर्मचा-याला कोरोनाची लागण झाल्यानंतर जेजे. मार्ग पोलिस ठाणे व डोंगरी पोलिस ठाण्यातील 20 अधिका-यांचे हॉटेल व खासगी ठिकांणांवर लिगीकरण करण्यात आले होते. त्यामुळे संख्याबळ कमी असतानाही आता तेथील पोलिस स्थानिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. 

भायखळा येथे देखील एक पोलीस कर्मचारी संशयीत सापडल्याने, नियमानुसार तेथील पोलीस वसाहतीतील एक इमारत देखील सील करण्यात आली आहे.  आर.ए.के मार्ग पोलीस वसाहतीतील इमारत आणि भायखळा पोलिस वसाहतीतील इमारत सील करण्यात आली आहे. अशा 6 वसाहती सील करण्यात आल्या आहेत. विशेष लक्ष ठेवण्यात आलेल्या, 15 वसाहतीत एक दिवसाआड वैद्यकीय् पथक जाऊन येथील अधिकारी-कर्मचा-यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी करीत आहेत. तर ज्यांना अशा प्रकारची लक्षणे वाटत आहेत, त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात येत आहेत. तसेच सर्व पोलीस वसाहतींचे गेट बंद केले असुन येणा-या जाणा-यांची कसुन तपासणी सुरु आहे.
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा