सरकारी कामात अडथळा, ७ जणांना अटक

पुढे जाण्यासाठी साईड देण्यावरून आरोपी सुमित मोरे यांचा बनसोडे यांच्याशी शाब्दिक वाद झाला. त्यावेळी मोरे याने बनसोडे यांना शिवीगाळ केली.

सरकारी कामात अडथळा, ७ जणांना अटक
SHARES

बेस्ट बस चालकाने पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या कारणांवरून मालाडमध्ये ७ जणांनी चिंचोली बंदर बेस्ट चौकीत घुसून वाहक आणि चालकाला मारहाण करत तोडफोड केली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा आरोप आहे.

हेही वाचाः- ‘जलयुक्त शिवार’ची खुली चौकशी, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मालाडच्या चिंचोली बंदर येथे रविवारी सायंकाळी बेस्टबस चालक मिलिंड बनसोडे हे सिग्नलला उभे होते. त्यावेळी पुढे जाण्यासाठी साईड देण्यावरून आरोपी सुमित मोरे यांचा बनसोडे यांच्याशी शाब्दिक वाद झाला. त्यावेळी मोरे याने बनसोडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बनसोडे हे बस ही चिंचोली बंदर येथील चौकीत घेऊन आल्यानंतर आरोपी त्याच्या पाठोपाठ चौकीत आले. त्यावेळी मोरेसोबत वैभव खांबे (२७), आदेश मोरे (२०), विवेक खांम्बे (२९), सुरज शंकर मोरे (३०), योगेश प्रकाश मोरे (४६), मयुर मुकुंद कांबळे (२०) हे देखील होते. त्यावेळी आरोपींनी बनसोडे आणि बेस्ट वाहक कुशल सुर्वे यांना शिवीगाळ केली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्या दोघांना मारहाण करत, बेस्टबसची काच, चौकीतील काचेचा ग्लास, टेबल, खुर्च्यांचे नुकसान केले.

हेही वाचाः- कंगनाला उत्तर देणार का? उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर ३५३, ३३२,४५२,१४३,१४,७,१४९,४२७ भा.द.वि कलमांसह कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रति अधिनियमसह कलम ७ गुन्हेगारी सुधारणा अंतर्गत ७ आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. या प्रकरणी मालाड पोलिस अधिकक तपास करत आहेत.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा