Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

‘जलयुक्त शिवार’ची खुली चौकशी, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडण्याची गरज आहे, याचा शोध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

‘जलयुक्त शिवार’ची खुली चौकशी, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
SHARES

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडण्याची गरज आहे, याचा शोध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत होती. त्यानंतर या अभियानास २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावातील कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२० अखेर मुदतवाढ देण्यात आली होती. अभियान आता संपुष्टात आलं आहे. अभियान विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग व खासगी उद्योजक (CSR) यांच्याकडील उपलब्ध निधीतून राबविण्यात आलं. २०१५-१६ ते सन २०१८-१९ अंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये सुमारे ६ लाखांच्या वर कामे करण्यात आली.

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाचा सामान्य आणि सामाजिक क्षेत्र व सार्वजनिक उपक्रमावरील वर्ष २०२० चा अहवाल क्रमांक -३ मध्ये महालेखापाल यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत नोंदविलेल्या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कार्यरत अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, म.रा., संजय बेलसरे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, कार्यरत संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे हे या समितीतील सदस्य असतील.

हेही वाचा- महाराष्ट्रातील उद्योजक, बाॅलिवूड निर्मात्यांना धमकावण्यासाठीच योगींचा दौर-सचिन सावंत

भारताचे नियंत्रक व लेखा परीक्षक यांच्या अहवालात नमूद ६ जिल्ह्यातील १२० गावांमध्ये तपासणी केलेल्या ११२८ कामांपैकी कोणत्या कामांची खुली चौकशी करणं आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे, याची शिफारस समिती संबंधित यंत्रणांना करतील.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५ पासून प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील क्षेत्रीय यंत्रणाकडून (maharashtra government) मागविण्यात आले होते. त्यानुसार साधारणत: ६०० च्या वर तक्रारींबाबतची माहिती प्राप्त झाली. तक्रारींची छाननी करुन त्यानुसार कोणत्या कामांची खुली चौकशी करणं आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे, याची शिफारस संबंधीत यंत्रणांना करावी लागणार आहे. याशिवाय समितीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या व समितीला आवश्यक वाटेल त्या कोणत्या कामांची खुली चौकशी करणं आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे याची शिफारस संबंधीत यंत्रणांना करावी लागणार आहे.

समितीने शिफारस केल्याप्रमाणे संबंधित यंत्रणा त्या कामासंदर्भात खुली चौकशी अथवा प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी तात्काळ सुरु करणार आहे. समिती नेमून दिलेल्या कार्यकक्षेनुसार ६ महिन्यांमध्ये कामकाज पूर्ण करणार आहे. समिती दर महिन्याला शिफारशी केलेल्या सर्व प्रकरणांबाबत अहवाल शासनास सादर करणार आहे.

(maharashtra government form a committee for inquiry of works under jalyukta shivar project)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा