Advertisement

नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेनेचं प्रत्युत्तर

नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, असं अनिल परब म्हणाले आहेत.

नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेनेचं प्रत्युत्तर
SHARES

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणाचाही एकमेकांशी ताळमेळ नाही. हे सरकार कुठल्याही कुठल्याही क्षणी कोसळेल, असा दावा करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांना शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, असं परब म्हणाले आहेत. 

नारायण राणे यांच्याकडून सर्टिफिकेट घेण्याइतके आमचे वाइट दिवस आले नाहीत. त्यांच्या बोलण्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर चांगलं काम करून दाखवल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. हाती सत्ता नसल्याने ते विरोधाला विरोध करत राहणारच, असा टोला अनिल परब यांनी लगावला. 

हेही वाचा- महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नको- नारायण राणे

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री राज्याला लाभल्याने महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. याला शिवसेनेसोबतच (shiv sena) अन्य दोन घटकपक्षही जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षभरात लोकहितासाठी, हिंदुत्वासाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? हा प्रश्न आहे. कोरोनाचे बळी आणि रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य एक नंबर वर आहे. कामामध्ये शून्य आणि याबाबतीत एक नंबर, अशी परिस्थिती आहे. मागच्या ६ महिन्यांमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून या सरकारने राज्याला दिवाळखोरीत नेल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता.

तुमचं ५६ आमदारांचं सरकार किती दिवस चालेल? असा प्रश्न विचारताना महाराष्ट्रासाठी हे सरकार पोषक नाही. हे सरकार गेल्यानंतर अन्य दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत युती होऊ शकते किंवा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं भाकीत देखील नारायण राणे यांनी वर्तवलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा