Advertisement

कंगनाला उत्तर देणार का? उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…

पत्रकार परिषद घेत उर्मिला मातोंडकर यांनी हिंदुत्वापासून ते बाॅलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य केलं. यावेळी त्यांना कंगना रणौतबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला.

कंगनाला उत्तर देणार का? उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…
SHARES

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवार १ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या नंतर पत्रकार परिषद घेत उर्मिला मातोंडकर यांनी हिंदुत्वापासून ते बाॅलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य केलं. यावेळी त्यांना कंगना रणौतबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेतील प्रवेशाबद्दल माहिती देताना सांगितलं की, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी पदाची अपेक्षा केली नव्हती. आज शिवसेनेत (shiv sena) आले तरीही मला पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे. सर्वसामान्य शिवसैनिक म्हणूनच मी पक्षासाठी काम करेन. शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. मी सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी होते. मी ‘पिपलमेड’ स्टार आहे. त्याचप्रमाणे ‘पिपलमेड लीडर’ व्हायला मला आवडेल, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं.

विधान परिषदेवरील शिफारशीविषयी उर्मिला म्हणाल्या, विधानपरिषदेसाठी माझ्या नावाची राज्यपालांकडे शिफारस केल्याचं मला कळतं आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा दर्जा वाढावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज असल्याचं उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं. 

हेही वाचा- अखेर उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, केला शिवसेनेत अधिकृत प्रवेश

हिंदुत्वासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उर्मिला मातोंडकर यांनी परखडपणे मत मांडताना सांगितलं की, सेक्युलर यांचा अर्थ इतर धर्मांचा द्वेष करणं असा होत नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि कर्मानेही हिंदू. देव मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. तसाच आपला धर्म जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय असतो. त्यामुळे दरवेळी वेशीवर उभं राहून उहापोह करण्याची मला गरज वाटली नाही. पण हिंदुत्वावादी म्हणून जिथं धर्माचा प्रश्न आला तिथं मी माझ्या धर्माप्रमाणे वागले आहे आणि यापुढेही वागेन. महाविकास आघाडीने वर्षभरात खूप चांगलं काम केलं आहे. कोरोनाचं संकट, वादळ असो किंवा इतर आपत्तीत सरकारने राजकारण करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला. कुठल्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना विशेष वागणूक न देता सगळ्यांना समान वागणूक दिली ही बाब मला खूप महत्त्वाची वाटते, असंही उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं.

कंगनाच्या टीकेवर उत्तर देण्याविषयी विचारलं असता, कंगनाला उत्तर देण्यासाठी मी कुठलीही मुलाखत दिली नव्हती. टीका करायला लोकशाही आहे. कंगनालाही अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे. या विषयाला नको तितकं महत्त्व दिलं गेलं आहे. देशाच्या राजकारणात सध्या विषारी वातावरण आहे. बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रयत्न मधल्या काळात झाला. मी तेव्हाही कुणाच्या विरोधात बोलले नाही, आताही बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या बाजूने बोलत आहे. सवंग आरोप करुन मला प्रसिद्धी मिळवायची नाही. कारण तो अत्यंत सोपा मार्ग असतो, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

(no need to talk much on kangana ranaut says urmila matondkar)

हेही वाचा- महाराष्ट्रातील उद्योजक, बाॅलिवूड निर्मात्यांना धमकावण्यासाठीच योगींचा दौर-सचिन सावंत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा