महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्विट, पोलिसांत गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची छायाचित्र ट्वीट करून त्याखाली आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्विट, पोलिसांत गुन्हा दाखल
SHARES

महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्याच्या नावाने सोशल मिडियावर आक्षेपार्ह ट्विट करत, त्यात मंत्र्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी व्हि.पी.रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शिवसेनेचा कायदेशिर सल्लागार असलेल्या धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत हा गुन्हा नोंदवून घेतला आहे.

हेही वाचाः-नवी मुंबईत बुधवारी ३५६ नव्या रुग्णांची नोंद

सोशल मिडिया म्हणजे माहितीचे मायाजाल, मात्र लाँकडाऊनच्या काळात सोशल मिडियाचा वापर हा माहितीसाठी कमी आणि आक्षेपार्ह ट्विट आणि अफवा पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला गेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी ५०० हून अधिक गुन्हेही नोंदवलेले आहेत. असे असताना अशा बेजबाबदार व्यक्तींची संख्या काही कमी झालेली नाही. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची छायाचित्र ट्वीट करून त्याखाली आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच त्या पोस्टद्वारे त्यांना शिवीगाळही केली आहे. नावाची बदनामी करण्याच्या हेतून हा प्रकार केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. समित ठक्कर नावाने हे ट्वीटर अकाउंट आहे. या अकाऊन्टवरून एकामागोमाग एक सहा आक्षेपार्ह ट्वीट केले गेले आहेत. याप्रकरणी भादंवि कलम २९२, ५०० व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखळ करण्यात आला असून पलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- Maratha Reservation: मराठा आरक्षण स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार- अशोक चव्हाण

१ जुलैला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बद्दल ट्वीट करताना आरोपीने शिवीगाळ गेली आहे. याशिवाय ३० जून व १ जुलैमध्येही संबंधीत ट्वीटर अकाउंटवरून आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही १ जूनला या ट्वीटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये त्यांना आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आले आहे. धर्मेंद्र मिश्रा यांनी हे सर्व ट्वीट पाहिल्यानंतर याबाबत व्हीपी रोड पोलिसांकडे याबाबत रितसर तत्कार केली. तक्रारीमध्ये संबंधीत ट्वीटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या आक्षेपाह्र ट्वीटचे स्क्रीनशॉर्टही पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.दरम्यान, संबंधीत ट्वीटर अकाउंट फार अॅक्टीव असून दररोज अनेक ट्वीट त्यावरून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा