शर्टाच्या बाह्या वर केल्या म्हणून ओला चालकावर जीवघेणा हल्ला


शर्टाच्या बाह्या वर केल्या म्हणून ओला चालकावर जीवघेणा हल्ला
SHARES

खुन्नस देण्याकरता शर्टाच्या बाह्या वर केल्याच्या गैरसमजातून ओला चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार अँटॉप हिल परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी विजय शर्मा उर्फ बिजवा (४४) नावाच्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्यावर तब्ब्ल २९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


संपूर्ण प्रकार...

गुरुवारी रात्री ओला चालक असलेला मंगेश तंगेला (३५) आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याने अनावधानाने आपल्या शर्टाच्या बाह्या वर केल्या. त्याचवेळी त्याच्यासमोर असलेल्या विजय शर्माने हे बघितलं आणि ओला चालक आपल्याला खुन्नस देत आहे असं त्याला वाटलं. त्यामुळे रागाच्या भरात बिजवाने त्याच्या जवळील चाकू काढला आणि ओला चालकाला काही समजण्यापूर्वीच त्याच्यावर हल्ला केला.


कसा पकडला गेला बिजवा

मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हा बिजवा पकडला गेला. बुधवारी रात्रीच्या सुमारास अँटॉप हिल परिसरात एक इसम चाकू घेऊन हिंडत असल्याचं मुख्य नियंत्रण कक्षात बसलेल्या पोलिसांनी बघितलं. तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षाने अँटॉप हिल पोलिसांना वर्दी दिली. काही मिनिटांतच अँटॉप हिल पोलीस घटनास्थळी पोचले आणि या बिजवाला पकडले. दुर्दैवाने तोपर्यंत त्याने ओला चालकाला जखमी केलं होतं. तो दुसऱ्या कोणावर हल्ला करण्याच्या बेतात असताना त्याला पोलिसांनी पकडले.


कोण आहे बिजवा?

विजय शर्मा उर्फ बिजवाविरोधात अँटॉप हिलसह वाडाळा, माटुंगा, आर. ए. के. मार्ग पोलीस ठाणे, डोंगरी, घाटकोपर आणि मालाड पोलिस ठाण्यात तब्बल २९ गंभीर गुन्हे नोंद असून त्याला चार वेळा तडीपार देखील करण्यात आले होते.हेही वाचा

भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांच्या समोरच दोघांवर चाकूहल्ला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा