पाचशे, हजारच्या जुन्या नोटांसहीत दोघे अटकेत

 Mumbai
पाचशे, हजारच्या जुन्या नोटांसहीत दोघे अटकेत

हाजीअली - येथील लाला लजपतराय मार्गावर पोलिसांनी बुधवारी एका एक्सयुव्ही कारमधून एक कोटी 60 लाखांच्या जून्या नोटा जप्त केल्या. यासोबतच दोघांना पोलिसांनी अटक केली. सायर माली (41), जयमिन व्होरा (34) अशी या दोघांची नावे आहेत. 500, 1000 च्या नोटा बदलण्यासाठी अज्ञात व्यक्ती एक्सयुव्ही कारमधून हाजीअली ताडदेव येथे बुधवारी रात्री येणार आहे, अशी माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरी कांदे याना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांना हजार पाचशेच्या नोटांसहित ताब्यात घेतले. एक्सयुव्ही गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील सीटवर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एक कोटी 60 लाखांच्या जुन्या नोटा मिळाल्या.

Loading Comments