नायगाव बीडीडीत स्लॅब कोसळून महिला जखमी

नायगावमधील बीडीडी चाळीतील १८/अ या इमारतीतील एका घरातील स्लॅब सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ६४ वर्षीय वृद्ध महिला आणि १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

  • नायगाव बीडीडीत स्लॅब कोसळून महिला जखमी
SHARE

नायगावमधील बीडीडी चाळीतील १८/अ या इमारतीतील एका घरातील स्लॅब सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ६४ वर्षीय वृद्ध महिला आणि १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. 


पुन्हा स्लॅब कोसळला

बीडीडीच्या १८/अ या इमारतीच्या तळमजल्यावर लोढे कुटुंबीय मागील ६० वर्षापासून वास्तव्यास आहे. या इमारतीत लोढे कुुटुंबियांच्या तीन खोल्या वडिलोपार्जित आहेत. मोठं कुटुंब असल्यामुळं हे कुटुंब जेवणासाठी एकत्र बसत असून रात्री झोपताना त्यांच्या इतर दोन खोल्यांमध्ये जात असतात. स्लॅब कोसळलेल्या खोलींमध्ये चंचला लोंढे, अविनाश लोंढे आणि त्यांचा नातू ओबेत लोंढे झोपले होते. सर्वजण झोपेत असताना सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास मोठा आवाज झाला आणि स्लॅब चंचला लोंढे यांच्या डोक्यावर पडला. तर काही मलबा ओबेतच्या डोक्यात पडला. मोठ्या आवाजामुळे शेजारील रूममधील सर्वांनीच लोंढे कुटुंबियांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली.


जीवितहानी टळली

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला चंचला आणि ओबेतला तातडीने परळच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. या दुर्घटनेत चंचला यांच्या डोक्याला २० टाके पडले आहेत. तर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला.  वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यांना वाचवण्यात यश आल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. 


दैव बलवत्तर 

याच घरात दररोज चंचला यांंच्यासोबत शालोम (९),  सारंग (४), अलिशा (३) आणि मोठा नातू ओबेत यांच्यासोबत झोपतात. मात्र सोमवारी शालोम, सारंग, अलिशा हे तिघेही तेथे झोपण्यासाठी नसल्यामुळे थोडक्यात बचावले. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी खोलीची दुरूस्ती करत आहेत.


बीडीडीचा पुर्नविकास कधी होईल हे माहित नाही. आमचा पुर्नविकासाला विरोध नाही. मात्र आमच्याही काही मागण्या आहेत. त्याकडं सरकार दुर्लक्ष करत आहे. आज माझ्या घरात ही दुर्घटना घडली. उद्या अन्य कोणाच्या घरात घडेल. दोन दिवस त्याचावर चर्चा होईल. मात्र पुढे काही होईल याची अपेक्षा नाही. सुदैवानं आमचं कुटुंब यात बचावलं. निदान आता तरी सरकार बीडीडीच्या पुर्नविकासाचा प्रश्न गांर्भीयाने घेईल का?  की, पुर्नविकासांचे घोंगड तसंच भिजत ठेवणार आहे. 

 - विराज अविनाश लोंढे,  चंचला लोंढे यांचा मुलगाहेही वाचा - 

डीसीपी अभिनाश कुमारांविरोधात हायकोर्टात याचिका; मोरल पोलिसिंगचा आरोप
संबंधित विषय
ताज्या बातम्या