SHARE

मुंबईत सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. रोज कुठे कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडतच असतात. आता सायन येथील जैन सोसायटीत घुसून या सोनसाखळी चोरट्यांनी एका वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी सायन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


अशी केली चोरी

सायनच्या जैन सोसायटीत राहणारी वृद्ध महिला ९ आॅक्टोबरला काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्यावर अंगावरील सोनं पाहिल्यानंतर दोन चोर त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्या वृद्ध महिलेने घराची वाट धरल्यानंतर हे दोघेही तिचा पाठलाग करत जैन सोसायटीजवळ आले.
रोडवर नागरिकांची आणि गाड्यांची वर्दळ कमी असल्याचं पाहून हे दोघेही महिलेच्या मागोमाग इमारतीत प्रवेश केला. त्या महिलेला काही समजायच्या आत त्याने मागून तिची सोन्याची चैन खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने प्रतिकार केला खरा मात्र त्याच्या शक्तीपुढे ती वृद्ध महिला फार काळ टिकू शकली नाही.


चोरी सीसीटीव्हीत कैद

हा चोरीचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून संबधित महिलेने सायन पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या