महापालिका अधिकाऱ्याला मारहाण

 Byculla
महापालिका अधिकाऱ्याला मारहाण

भायखळा - येथील ई वॉर्डमधील सहाय्यक अभियंता सतीश मालेकर यांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली. शमशाद खान असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बुधवारी दुपारी सतीश मालेकर हे आपल्या कार्यालयात काम करीत असताना शमशाद खान हा त्यांना माहितीच्या अधिकाराखाली नागपाडा येथील 24 मजली अफिया टॉवरची माहिती मागण्यासाठी आला होता. त्यावेळी मालेकर यांनी चलनाचे पैसे भरून माहिती घ्या असे शमशादला सांगितले. तेव्हा शमशाद याने आपल्याला इमारतीची माहिती नको तर त्याचे निष्कासन हवे आहे तसेच इमारतीच्या विकासकाला माझ्याकडे पाठवण्याची व्यवस्था करा, असे त्याने मालेकरांना सांगितले. त्यावर मालेकर यांनी तुम्हाला केलेल्या कारवाईची माहिती मिळेल असे सांगितले. यावर त्याने त्यांना तुम्ही कारवाई का करत नाही? हे मी बघतोच अशी धमकी दिली. तेव्हा मालेकरांनी त्याला केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा त्याने त्यांचा गळा दाबत मारहाण करण्यास सुरूवात केली.

Loading Comments