व्यापाऱ्यांना बनावट सोनं विकणारा जेरबंद

त्यांनी व्यापाऱ्याशी संपर्क करून त्याला प्रती तोळा २० हजार रुपयांनी सोने देतो असं सांगितलं. व्यापाऱ्याला दोघांवर संशय आल्याने त्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती दिली.

व्यापाऱ्यांना बनावट सोनं विकणारा जेरबंद
SHARES

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील व्यापाऱ्यांना बाजार भावापेक्षा कमी किंमतीने सोनं देण्याचं आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्याला गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे. दिपक बाबू शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आणि त्याच्या साथीदाराने अनेक व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडवल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली. 

कांदिवली परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यापाऱ्याचा सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी सोने खरेदीसाठी झवेरी बाजार येथे गेले होते. त्या ठिकाणी दोघांनी व्यापाऱ्याचा रस्ता अडवत त्याला प्रती तोळा ३० हजार रुपयांनी सोनं देतो असं सांगितलं. व्यापाऱ्याने सोनं तपासले असता ते सोनं खरं होतं. त्यानुसार दोघांनी पुढील व्यवहारासाठी व्यापाऱ्याचा मोबाइल नंबरही घेतला. मात्र त्या दोघांच्या आमिषाला व्यापारी बळी पडला नाही.

५ नोव्हेंबर रोजी पुन्हा त्यांनी व्यापाऱ्याशी संपर्क करून त्याला प्रती तोळा २० हजार रुपयांनी सोने देतो असं सांगितलं. व्यापाऱ्याला दोघांवर संशय आल्याने त्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी व्यापाऱ्याच्या मदतीने सापळा रचला. व्यापाऱ्याने आरोपींना १० तोळ्याची सोन्याची बिस्किटे घेऊन बोलावलं. आरोपी दिपक सोने घेऊन त्या ठिकाणी आला. यावेळी व्यापाऱ्याने बिस्किटे तपासली असता बिस्किटांना फक्त सोन्याचा मुलामा देण्यात आला असल्याचं दिसून आलं. 

बिस्किटे खोटी असल्याचं समजल्यानंतर व्यापाऱ्याने जवळच सापळा रचून उभ्या असलेल्या पोलिसांना खुनावलं. पोलिसांनी सोनं घेऊन आलेल्याला अटक केली. दिपक हा चेंबूरचा रहिवाशी आहे. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने नवी मुंबई, ठाणे, मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांना अशा प्रकारे गंडवल्याचं पुढं आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा  -

रस्त्यात मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्यास अटक

शिवडीत ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा