एमडीची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत


एमडीची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत
SHARES

मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भायखळा अग्निशमन केंद्राजवळ एमडी या अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या ३५ वर्षीय तरुणाला रंगेहाथ अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून २५० ग्रॅम एमडी हस्तगत केले असून त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचं पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितलं.


पोलिसांनी लावला छडा

मोहम्मद अली रोडवरील इब्राहिम मर्चंट रोडवरील फॅन्सी महल इमारतीत कासिम मोहम्मद सिद्दिकी हा आपल्या कुटुंबियांसोबत रहात होता. मागील अनेक दिवसांपासून सिद्दिकी एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. 


आरोपीला अटक

गुरुवारी संध्याकाळी सिद्दिकी भायखळा येथे अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती एएनसीच्या वरळी युनिटला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिसांनी एनडीपीआरएस अॅक्टनुसार गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. हे ड्रग्ज तो कुठून आणत होता. त्याला कोण देत होतं? याचा पोलिस आता शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा