गडोली एन्काऊंटर प्रकरणात हरियाणातून एकाला अटक

हरियाणातील गँगस्टर बिंदरच्या मागावर होते. मात्र वेळोवेळी बिंदर हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरायचा. हरियाणात नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत एका उमेदवाराच्या रॅलीत बिंदर मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गडोली एन्काऊंटर प्रकरणात हरियाणातून एकाला अटक
SHARES

हरियाणाचा कुख्यात गुंड संदीप गडोली याची पोलिसांच्या मदतीने हत्या घडवून आणणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणातून अटक केली आहे. बिंदर गुर्जर असं या आरोपीचं नाव आहे. बिंदर आणि गडोली यांच्यात असलेल्या वादातूनच बिंदरने पोलिसांच्या मदतीने संदीपचा अंधेरी येथील हाॅटेलमध्ये एन्काऊंटर केला होता. या प्रकरणात बिंदरचा मागील अनेक दिवसांपासून पोलिस शोध घेत होते.

विलेपार्ले येथील एका हॅाटेलमध्ये आरोपी संदीप गडोली त्याची मैत्रिण आणि मित्रांसह थांबला होता. दरम्यान ७ फेब्रुवारी, २०१६ रोजी हरियाणाच्या गुरगाव पोलिस ठाण्याचे आठ पोलिस मुंबईत आले होते. त्यावेळी हरियाणा पोलिसांनी अंधेरी(प.) येथील हॉटेलमध्ये घुसून गडोलीवर गोळ्या झाडल्या होत्या. या बनावट चकमकीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक प्रद्मुमन यादव, दीपककुमार, विक्रम सिंग आणि जितेंद्र यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. या सर्वांना हरियाना पोलिसांनी निलंबीत केले होते. मात्र कॉन्स्टेबल परमजीत अहलावट हा फरार झाला होता. मागील सहा महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान गुरूवारी गुरगाव येथे हरियाणा पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत परमजीतला अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत त्यांनी संदीपची हत्या ही हरियाणातील एका गँगस्टरच्या सांगण्यावरून केल्याची कबूली दिली.

 गडोली हत्या प्रकरणाचा तपास हे गुन्हे शाखा १० चे पोलिस करत होते.  पोलिस हे हरियाणातील गँगस्टर बिंदरच्या मागावर होते. मात्र वेळोवेळी बिंदर हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरायचा. हरियाणात नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत एका उमेदवाराच्या रॅलीत बिंदर मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हरियाणा पोलिसांच्या मदतीने त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस आता बिंदरची चौकशी करत आहेत.



हेही वाचा  -

मुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या

चेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा