रेशनच्या दुकानात चिमुरड्याचा मृतदेह

 Kurla
रेशनच्या दुकानात चिमुरड्याचा मृतदेह
रेशनच्या दुकानात चिमुरड्याचा मृतदेह
See all

कुर्ला - बैलबाजार परिसरातल्या रेशन दुकानात सोमवारी एका चिमुरड्याचा मृतदेह आढळला आहे. करण निषाद असं या मुलाचं नाव असून तो दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. शनिवारी शाळेत गेलेला करण पुन्हा घरी आलाच नाही. शोध घेऊनही करण सापडला नाही तेव्हा त्याच्या आईने विनोबा भावे पोलिसात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. पण सोमवारी सकाळी एका रेशनच्या दुकानात करणचा मृतदेह आढळला. विनोबा भावे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Loading Comments