दहिसरमध्ये बनावट दारू विक्रेत्याला अटक

 Moti Bawdi
दहिसरमध्ये बनावट दारू विक्रेत्याला अटक

दहिसर - बनावट देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिसर (पू) इथल्या लोखंडे चाळीतल्या मोटी बावडी परिसरात राहणारा प्रकाश उर्फ पिंटो छोटेलाल ठाकूर हा त्याच्याच घरी बनावट देशी दारूची विक्री करत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत देशी बनावटी दारूच्या 19 बाटल्या जप्त केल्या. यासह त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

Loading Comments