आऊच... कास्टिंग काऊच !

  मुंबई  -  

  मालाड - फिल्म इंडस्ट्रीसाठी कास्टिंग काऊचचे प्रकार आता नवे राहिलेले नाही. अनेक नामांकित कलाकारही कारकीर्दिच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचे शिकार झालेत. झगमगत्या सिनेसृष्टीत प्रवेश करण्यासाठी अनेक तरुणी इच्छुक असतात. विशेषकरून त्याच अलगतपणे कास्टिंग काऊचच्या जाळ्यात अडकतात. आता यात भर पडली आहे ती ऑनलाईन कास्टींग काऊचची. नामांकित दिग्दर्शकाच्या बनावट फेसबूक प्रोफाइलद्वारे तरुणींचं ऑनलाईन कास्टिंग काऊच करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी जेरबंद केलंय. मोहम्मद शोएब इकबाल जेठवा असं त्याचं नाव आहे. त्यानं नामांकित दिग्दर्शक अयान मुखर्जी यांची बनावट प्रोफाइल बनवली होती. 

  बनावट फेसबुक प्रोफाईलच्या जाळ्यात मालाड परिसरात एक मॉडेल अडकली. फेसबुकवर झालेली ही मैत्री पुढे या तरुणीला चांगलीच महागात पडली. या तरुणीच्या तक्रारीनंतर क्राईम ब्रॅंचनं वेगानं सूत्र हलवली आणि मोहम्मद शोएब इकबाल जेठवाला अटक केली. या तरुणीवर आलेलं कास्टींग काऊचचं संकट थोडक्यात निभावलं. पण चंदेरी दुनियेत झटपट प्रवेश मिळवण्याच्या नादात अनेक तरुणी या कास्टिंग काऊचच्या दलदलीत फसतात. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.