अभिनेता करण ओबेराॅवर खोटे आरोप करणारी महिला अटकेत

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ज्योतिषी महिलेला ओशिवरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. या महिलेने २५ मे रोजी स्वत:वरच हल्ला करवून घेतला होता.

SHARE

अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ज्योतिषी महिलेला ओशिवरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. या महिलेने २५ मे रोजी स्वत:वरच हल्ला करवून घेतला होता. त्यानंतर हा हल्ला करणने केल्याची तक्रार तिने पोलिसांत केली होती. या खोट्या हल्ल्याचे पुरावे हाती लागल्यावर पोलिसांनी तिला गजाआड केलं.

कसा केला खोटा हल्ला? 

तक्रार करणारी महिला मॉर्निंग वॉकला गेली होत्या. त्यावेळी बाइकवरून आलेल्या दोघांनी तिच्यावर पेपर कटरने हल्ला केला. तसंच अॅसिड फेकण्याची धमकी देत एक चिट्ठी फेकून ते पसार झाले. या चिठ्ठीत तक्रार मागे घे' असं लिहिण्यात आलं होतं.

हल्लेखोर ताब्यात

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे २ दिवसांत हल्लेखोरांचा शोध लावत याप्रकरणी ४ जणांना अटक केली. या चौघांची कसून चौकशी केल्यावर चारपैकी एकजण संबंधित महिलेच्या वकिलाचा चुलत भाऊ असल्याचं पुढे आलं. हा योजनाबद्ध हल्ला होता. त्यासाठी आम्हाला महिलेच्या वकिलाकडून १० हजार रुपये देण्यात आले, अशी कबुली या हल्लेखोरांनी दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रारदार महिलेला अटक केली.

दिली कबुली

दरम्यान, अटकेआधी सदर महिलेने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केला. पोलीस आयुक्त आणि ओशिवरा पोलिसांना मी याबाबत कळवले आहे. मी निर्दोष आहे. माझ्या आधीच्या वकिलाने मला फसवले आहे, असे ही महिला म्हणाली. हेही वाचा-

अखेर अभिनेता करण ओबेराॅयला जामीन

पुरुषांसाठी 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज: पूजा बेदीसंबंधित विषय
ताज्या बातम्या