मुंबईत दरोडेखोरांचा उच्छाद, मुंबई पोलिसांनी ३ टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या


मुंबईत दरोडेखोरांचा उच्छाद, मुंबई पोलिसांनी ३ टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या
SHARES

शासनाने लॉकडाऊन शिथिल करताच शहरामध्ये चोर, दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मुंबईत दरोडे टाकण्यासाठी आलेल्या अशाच तीन टोळ्यांच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. विशेष म्हणजे यातील दोन टोळ्यातील आरोपींकडे पोलिसांनी बंदुक आणि जिवंत काडतुसेही आढळून आली आहेत. तीनही टोळीतील आरोपींवर या पूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

हेही वाचाः- मुंबईत २२-२३ डिसेंबरला पाणी कपात

बोरिवलीच्या कस्तुरबा पोलिस ठाणे परिसरातील देवीपाडा येथील ज्वेलरीच्या दुकानावर दरोडे टाकण्यासाठी आलेल्या ३ आरोपींनी कस्तुरबा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. राजेश सिंग (२२), धर्मेंद्र सिंग (२२), आकाश गायकवाड (१९) अशी या आरोपींची नावे आहेत. यातील राजेश आणि धर्मेंद्रवर या पूर्वीही विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीच्या इतर दोन सदस्यांचा शोध पोलिस घेत आहेत. तर दुसरीकडे कुर्लाच्या विनोबा भावे परिसरात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या ४ जणांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या आरोपींच्या झडतीत पोलिसांना एक देशी कट्टा, दोन चाकू, एक स्क्रूड्रायवर मिळून आले आहेत. मेहूल राजू अरुंदेकर (२४), विजय वेलजी पटेल उर्फ कटल्या (३३), अजय वेलजी पटेल उर्फ अज्या (३२), मोहम्मद इम्रान मोहम्मद अली शेख (२९) अशी या आरोपींची नावे आहेत. यातील मेहूलवर ७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विजयवर ३ गुन्हे तर अजयवर ७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांच्या कारवाईत त्यांच्या हातातून निसटलेला सराईत आरोपी दाविद कसबे याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच्यावर ही ३ सराईत गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचाः-मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक

तर धारावी सारख्या गजबजलेल्या ठिकाणी सायंकाळी ६ वा. ६० फूट रोडवरील अर्हम ज्वेलरस्वर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील चौघांना घातक शस्त्रासह अटक केली आहे. अन्वर हुसेन मोईनुद्दीन शेख (३७), बाबु रामलु मदिला (३५), अमित शिंदे (३५), अनिलकुमार जाँनीराम मिरस जाटप (३२) अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी माहिम परिसरातलेच आहेत. पोलिसांनी या टोळीकडून देखील एक देशी कट्टा, १ जिवंत काडतुस, दोन चाँपर, एक स्टीलचे पाते, तलवार, दोरखंड, मिरची पावडर आणि २ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा