Advertisement

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक

मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुरू होणारी बुलेट ट्रेनची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत. भारतातील जपान दूतावासानं ई ५ सिरीज शिंकान्सेन बुलेट ट्रेनची काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

SHARES
01/4
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक
पुलांचे, बोगद्याचे डिझायनिंगचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ही रेल्वे रुळावर आली, तर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या २ तासात पूर्ण होईल.
02/4
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक
मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २०२३-२४ ची डेटलाईन यापूर्वीच दिली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जपानची ही बुलेट ट्रेन आणखी मॉडीफाय करून मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन म्हणून चालवली जाणार आहे.
03/4
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक
बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील १०८ गावातून जाणार आहे. बहुतेक गाव पालघर जिल्ह्यात आहे. संपूर्ण प्रकल्प अग्नि आणि भूकंप प्रतिरोधक असेल. भू-संवेदनशील भागात भूकंप मापन आणि पवन मोजण्यासाठी यंत्रणा बसविली जातील.
04/4
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक
पीएम मोदी आणि त्यांचे तत्कालीन जपानी समकक्ष शिन्झो आबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. अशाप्रकारे, जपानचे आयकॉनिक 'शिंकन्सेन' बुलेट-ट्रेन तंत्रज्ञान विकत घेणारा भारत तैवाननंतर पहिला देश बनला.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा