• अभिनेत्रीला कुत्र्यांनी पोहोचवले हॉस्पिटलमध्ये
SHARE

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री पारुल यादव हीच्यावर तिच्या घराजवळ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात पारुल गंभीर जखमी झाली आहे. अंधेरी येथे एका अपार्टमेंटमध्ये पारुल राहत असून सोमवारी संध्याकाळी ती घराबाहेर पडली तेव्हा चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी पारुलवर हल्ला केला. या हल्ल्यात पारूलच्या हाताला जबर जखम झाली असून तिच्या डोक्याला देखील इजा झाली असल्याची माहिती पारुलची बहीण शीतल यादवने दिली. सध्या पारुलला अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, जखमा खोल असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची देखील शक्यता आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या