कुलभूषणला परत आणा, मित्रांचं सरकारला साकडं !

Mumbai
कुलभूषणला परत आणा, मित्रांचं सरकारला साकडं !
कुलभूषणला परत आणा, मित्रांचं सरकारला साकडं !
See all
मुंबई  -  

भारतीय हेर असल्याचा ठपका ठेवत गेल्या वर्षभरपासून पाकिस्तानी जेलमध्ये असलेल्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्याने संपूर्ण देश हादरला आहे. मुंबईतील कुलभूषण यांचे मित्र या निर्णयाने हेलावून गेले असून, कुलभूषण यांना परत आणण्याची मागणी केली जात आहे .

एसीपी सुधीर जाधव यांचा मुलगा असलेला कुलभूषण हे डिलाइल रोड येथील पोलीस वसाहतीत लहानाचे मोठे झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर कुटुंब पवईला शिफ्ट झाले असले तरी आजही कुलभूषण यांना सगळेच ओळखतात.

पकिस्तानच्या या निर्णयाने कुलभूषण यांचे बलपणाचे मित्र तुळशीदास पवार यांना चांगलाच धक्का बसला आहे. कसंही करून कुलभूषण यांना परत आणण्याची मागणी त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केली.

कुलभूषण हा आमच्या सगळ्यांसारखा एक सामान्य भारतीय असून, त्याला नेहमीच व्यवसाय करायचा होता. म्हणून तो सेवानिवृत्त झाला. तो सगळ्यांना मदत करत असे. आम्ही सुषमा स्वराज तसेच इतरांकडे यातून काही तोडगा काढण्याची विनंती करतो असं ते यावेळी म्हणाले.

आम्ही हाफिज सईद विरोधात एवढे पुरावे देऊनही पाकिस्तानने कधी करवाई का केली नाही? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

'पाकिस्तानने त्याला त्याची बाजू ठेवण्याची संधी दिली नसून, आम्हाला तो परत हवाय? याचा पुनरूचार देखील त्यांनी केला आहे. दरम्यान, पकिस्तानच्या या कृतीचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.