मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं अखेर निलंबन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं अखेर निलंबन
SHARES

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे.

खंडणी, अॅट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती.

यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. तसंच परमबीर सिंह ज्या गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे, याप्रकरणीही चौकशी करण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी चांदीवाल आयोगानं परमबीर सिंहांना बजावलेलं जामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे.

काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणानं वेगळं वळणंही घेतलं. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे.



हेही वाचा

भिवंडीत अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक, पॅन-आधार जप्त

निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार- अनिल परब

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा