भिवंडीत अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक, पॅन-आधार जप्त

अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, २८ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

भिवंडीत अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक, पॅन-आधार जप्त
SHARES

भिवंडीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी एकाच महिन्यात ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. अटक केलेले सर्व बांगलादेशी वळगाव इथल्या प्रितेश कंपाऊंड आणि कामतघर येथील चाचा भतीजा कंपाऊंडमध्ये मजुरी करत होते.

पोलिसांनी छापा टाकून या सर्वांना अटक केली आहे. अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, २८ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

नारपोली पोलिसांनी छापा टाकून राजू मिया उर्फ राणा रहीम मिया (३२), मिजानूर रहेमान अब्दुल रहेमान (३२), बप्पीअली उर्फ इजाजुल जाफरअली (२७), शामिम उस्मान अली शेख (२७), बिलाल फरीद खान (१९), ओस्मान रौफीक खान (२४), शमीम अहमद अब्दुल कुददुस आहमद (३१), मोहमद आमीन मोहमद अजिदूर रहेमान अन्सारी (४०), हलाउद्दीन अनामिया (२०), फारूक सौफिक आलम (२६) अशा दहा बांगलादेशींना अटक केली आहे.

शांतीनगर पोलिसांनी छापेमारी करत तब्बल २० बांगलादेशींना अटक केली आहे. शांतीनगर पोलिसांनी मोहम्मद इमोन मोहम्मद आलमबीर खान उर्फ इमाम खान (२०) राजू महमंती इमानली उर्फ राजू शेठ (२०) व इतर अठराजण अशा २० बांगलादेशींना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वास्तव करताना आढळून आल्यानं अटक केली.

भिवंडी शहर पोलिसांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध राहणाऱ्या तारा खुशबार मंडळ (३२) शाहजमाल मो. गुलाम मुस्तफा (२४) आणि इतर आठ अशा दहा जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे .

तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ४० बांगलादेशींना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, २८ मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

बांगलादेशाचा विझा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येऊन अनधिकृतपणे वास्तव्यास राहून मजुरी करीत असल्याचे आढळून आले आहे. मागील दहा दिवसांपूर्वी भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी देखील अशाच प्रकारे अवैध वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करून अटक केली आहे .



हेही वाचा

परमबीर सिंह यांच्यावरील कारवाईचा निर्णय लवकरच - गृहमंत्री

२ परदेशी महिलांकडून २० कोटींच्या हेरॉइन जप्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा