परमबीर सिंह यांच्यावरील कारवाईचा निर्णय लवकरच - गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह वर काय कारवाई केली जाईल यासंदर्भात माहिती दिली.

परमबीर सिंह यांच्यावरील कारवाईचा निर्णय लवकरच - गृहमंत्री
SHARES

परमबीर सिंह यांनी केलेल्या गैरव्यवहारांसाठी त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल? अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी दिलीप वळसे पाटील यांना केली. त्यावर पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली.

परमबीर सिंह यांच्यावर पोलीस सेवा नियमावलीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल. यासंदर्भात पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्याशी बोलल्यानंतरच घेतला जाईल, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सध्या फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काल मुंबईत दाखल झाले.

परमबीर सिंह हे मागील काही महिन्यांपासून तपास यंत्रणांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करत होते. फौजदारी गुन्हे दाखल असल्यामुळे अटकेच्या भीतीनं गेल्या अनेक दिवसांपासून ते गायब होते. सिंह यांना सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

परमबीर सिंह खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी गुरुवारी कांदिवलीतील क्राईम ब्रांच युनिटसमोर हजर झाले. न्यायालयाकडून आणि ईडीकडून देखील चौकशीचे समन्स दिल्यानंतरही ते हजर झाले नाहीत. ते आता अखेर हजर झाले असून आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची चर्चा सुरू झाली.



हेही वाचा

"परमबीर सिंहांकडून कसाबला मदत", निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रक्षकाला लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा