"परमबीर सिंहांकडून कसाबला मदत", निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

"परमबीर सिंहांकडून कसाबला मदत", निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

मुंबईच्या एका निवृत्त एसीपीनं हा आरोप केलाय. निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर आरोप केला आहे की, सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती.

पठाण यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात म्हटलं आहे की, त्यांना अशी शंका आहे की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता.

अजमल कसाबचा मोबाईल सिंह यांनी चौकशीसाठी घेतला होता. त्यावेळी ते महाराष्ट्र ATS मध्ये कार्यरत होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे ट्रांसफ़र केली होती. त्यानंतर सिंह यांनी तो मोबाईल क्राईम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी केला आहे. पठाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या मोबाईलवरुन या हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅन्डलरशी संवाद करत होते. त्यानंतर त्यांनी मोठा हल्ला केला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, असं पठाण यांनी म्हटलं आहे.

खंडणीसह अनेक आरोप असलेल्या परमबीर सिंह यांनी आता दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केला आहे.

दरम्यान, परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीर सिंह नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला होता.



हेही वाचा

परमबीर सिंह मुंबईत दाखल

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी हायकोर्टाकडून रद्द

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा