Advertisement

निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार- अनिल परब

एसटी संपातील कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी होत आहेत.

निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार- अनिल परब
SHARES

एसटी संपातील कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी होत आहेत. अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचं परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.

एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू आहे. मात्र वेतनवाढीनंतर मोठ्या संख्येनं कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण ते कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे आदेश होते.

त्यानुसार कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं. पण अनेक कर्मचारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. ते निलंबन मागे घेतल्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा