पार्किंगच्या वादातून एकाची पवईत हत्या

पवईच्या हरिओम नगर परिसरात अशाच पार्किंगच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. शैलेश सिंग (३४) असे या मृत तरुणाचं नाव आहे.

SHARE

मुंबईत दिवसेंदिवस वाढत्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न गहन होत चालला आहे. पवईच्या हरिओम नगर परिसरात अशाच पार्किंगच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. शैलेश सिंग (३४) असे या मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी एका दाम्पत्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


भांडण 'असं' झालं सुरू

पवईच्या हरि ओम नगरमध्ये आरोपी सुखदेव खडका हा पत्नी एेश्वर्यासोबत रहात होता. त्याच इमारतीत शैलेश हा देखील रहात होता. गुरूवारी इमारतीच्या गेटवर सुखदेव याने त्याची गाडीपार्क केली होती. गेटमधून येत जाताना गाडी अडचणीची ठरत असल्यामुळे शैलेशने त्याला गाडी काढण्यास सांगितलं. यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की सुखदेव आणि शैलेश या दोघांमध्ये हाणामारी झाली. हे पाहून सुखदेवची पत्नी ऐश्वर्याही शैलेशला मारण्यासाठी धावली. दोघांनी बेल्ट आणि बांबूने शैलेशला मारहाण करत गंभीर जखमी केलं.


रुग्णालयात मृत्यू

शेजाऱ्यांनी दोघांमधील वाद मिटवत जखमी शैलेशला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. यानंतर शैलेशच्या भावाने पवई पोलिस ठाण्यात रितसर गुन्हाही दाखल केला. शैलेशला उपचार करून घरी आणल्यानंतर अचानक ७ च्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्याला पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी सुखदेवची पत्नी ऐश्वर्या हिला अटक केली असून सुखदेव फरार झाला आहे.हेही वाचा-

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बाॅलीवूडच्या कोरिओग्राफरला अटक

४ कारवायांमध्ये १६ लाखांचे ड्रग्ज हस्तगत; अंमली पदार्थ विभागाची कारवाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या