मेट्रो ३ च्या खोदकामात आढळली स्फोटकं


मेट्रो ३ च्या खोदकामात आढळली स्फोटकं
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठी सध्या जोरात खोदकाम सुरु आहे. या खोदकामादरम्यान मुंबईच्या पोटातून माती, दगड निघत आहेतच, पण बुधवारी मात्र या खोदकामादरम्यान चक्क स्फोटकं बाहेर निघाली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

बुधवारी दुपारी मुंबई सेंट्रल टर्मिनलच्या प्रवेशद्वारानजीक मेट्रो ३ चं खोदकाम सुरू होते. त्यावेळी हेड कॉन्स्टेबल मुकेश कुमार हे गेटवर गस्तीसाठी होते. त्यावेळी त्यांना तिथं स्फोटकं आढळून आली. त्यानंतर लागलीच पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांबरोबर यावेळी श्वान पथकही होतं. नागपाडा पोलिसांनी पंचनामा करत ही स्फोटकं कलिना येथील न्यायसहायक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवली आहेत. याप्रकरणी पुढील शोध नागपाडा पोलिस घेत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा