पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपी डाॅक्टरांना शिक्षण पूर्ण करण्यास न्यायालयाने दिली परवानगी

उच्च न्यायालयाने या तीनही डॉक्टरांना सशर्थ जामीन देत म्हटले होते की, आरोपींना शिक्षण पूर्ण करता येणार नाही. मात्र आरोपींनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय न्यायालयाने दिला.

पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपी डाॅक्टरांना शिक्षण पूर्ण करण्यास न्यायालयाने दिली परवानगी
SHARES

मुंबईतील बहुचर्चित पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डाँक्टरांना आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील शिक्षण घेण्याची मुभा दिली आहे. न्यायालयाने गुरूवारी या गुन्ह्यावरील सुनावणी दरम्यान ही मागणी मान्य केली. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने या तीनही डॉक्टरांना सशर्थ जामीन देत म्हटले होते की, त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करता येणार नाही. मात्र आरोपींनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय दिल्याचेही न्यायालयाने सांगितले.

हेही वाचाः- मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

मुंबईतल्या बहुचर्चित डाॅ पायल तडवी आत्महत्या प्रकरणातून दोन डाॅक्टरांना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने काही दिवसांपूर्वी  क्लिन चीट दिली होती.  पायलने आपल्यावर होत असलेल्या रॅगिंगबद्दल आपले वरिष्ठ चिंग लिंग आणि शिरोडकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे चौकशीच्या भोवऱ्यातअडकलेल्या चिंग लिंग आणि शिरोडकर यांना आता मानवाधिकार आयोगाने क्लिनचिट दिली होती. नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहरे या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून पायची रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप पायलच्या कुटुंबियांनी केला होता. पायलच्या आत्महत्या प्रकरणी नायर रुग्णालयातील संबधित वैद्यकीय कर्मचारी, तज्ज्ञ तसेच विभागप्रमुख, अधिष्ठाता यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीच्या आधारावर न्यायालयाने आरोपी डाॅक्टरांची जामीनावर मुक्तता केली. मात्र त्यांना पुढील शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली नव्हती. त्यावेळी तिन्ही आरोपी डाॅक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

हेही वाचाः-नागरिकांना गूगल मॅपवर मिळणार प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अद्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, या डॉक्टरांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मान्यता द्यायला हवी. या काळात ते साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे प्रभावित करणार नाहीत. आरोपींना ट्रायल कोर्टासमोर प्रत्येक तारखेला उपस्थित राहावे लागेल. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आरोपी डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारने याचिकाकर्त्यांना विरोध करत म्हटले होते की, जो पर्यंत या प्रकराची सुनावणी होत नाही तोपर्यत आरोपींना पुढील शिक्षणाची परवानगी मिळू नये. दरम्यान, न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात जर आरोपी निर्दोश सिद्ध झाले आणि सुनावणी दरम्यान त्यांना जर पुढील शिक्षणाची परवानगी नाकारण्यात आली तर त्यांचे करिअर संपुष्टात येईल. त्यामुळे आरोपींच्या भविष्याचा निर्णय विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींना पुढील शिक्षण घेण्यास परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई येथील नायर हॉस्पिटल मधील शिकाऊ डॉक्टर पायल तडवी हिने आत्महत्या गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात नायर हॉस्पिटलमधील तीन महिला डॉक्टर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पायल तडवी हिला या रुग्णालयातील डॉक्टर जातीवाचक टीप्पणी करत असत. तसेच, मनभंग होईल असे वारंवार बोलत असत. सततच्या या छळाला कंटाळून पायल तडवी हिने आत्महत्या केली, असा या महिला डॉ्टरवर आरोप आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा