५ रूपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या

अवघ्या ५ रुपयांवरून रिक्षाचालकाची (Rickshaw driver) हत्या (murder) झाल्याची घटना बोरीवली (boriwali) येथे उघडकीस आली आहे.

५ रूपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या
SHARES

अवघ्या ५ रुपयांवरून रिक्षाचालकाची (Rickshaw driver) हत्या (murder) झाल्याची घटना बोरीवली (boriwali) येथे उघडकीस आली आहे. रामदुलार सरजू यादव (६८) असं मृत रिक्षाचालकाचं नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. 

रिक्षामध्ये (Rickshaw) सीएनजी (cng) भरून झाल्यानंतर उरलेले ५ रूपये मागितल्यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालक (Rickshaw driver) रामदुलारीची हत्या केली. रामदुलार यादव मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बोरीवली (boriwali) पूर्वेकडील मागाठणे पोलीस चौकीजवळील पेट्रोल पंपावर (Petrol pump) रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी गेला. सीएनजी (cng) गॅस भरल्याने रामदुलार याने येथील कर्मचाऱ्याला पैसे दिल्यानंतर पाच रूपये शिल्लक राहत होते. रामदुलार याने गॅस भरणाऱ्याकडे पाच रूपये मागितले. मात्र, सुट्टे पैसे नसल्याने कर्मचाऱ्याने ५ रुपये दिले नाहीत. यावरून रामदुलार आणि कर्मचाऱ्यात भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. 

ही हाणामारी पाहून पेट्रोल पंपावरील (Petrol pump) ४ ते५ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन रामदुलारला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. हत्येचा गुन्हा दाखल करून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पेट्रोलपंपावरील ५ कर्मचाऱ्यांना अटक केली. रामदुलार हा नालासोपारा येथे कुटुबासोबत राहत होता. हेही वाचा -

पालिका कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा उशिरा लागू

मिठाईवर उत्पादन तारखेसह मुदत संपण्याचा कालावधी बंधनकारक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा